40.6 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून संधीचे सोने करा- जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून संधीचे सोने करा- जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

0
135

blank

गोंदिया ता.४ :लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संधी चालून आलेली आहे. लोकांचे आरोग्य,शिक्षण, उपजीविका आणि सामाजिक न्याय क्षेत्रात सहभाग वाढवून संधीचे सोने करा असे आवाहन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी (ता. 3) केले. गोंदिया जिल्हापरिषदेच्या वतीने येथील जलाराम लान सभागृहात आयोजित कार्यशाळेत श्री भेंडारकर अध्यक्ष पदावरून बोलत होते.मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, जिल्हा परिषदेच्या सभापती रजनी कुंभरे, दीपा चंद्रकापुरे, पौर्णिमा ढेंगे, गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडाले, तिरोड्याचे तेजराम चव्हाण, गोरेगावच्या चित्रकला चौधरी, अर्जुनी /मोर च्या आम्रपाली डोंगरवार ,
सालेकसाच्या वीणा कटरे, आमगावच्या योगिता पुंडे, सडक अर्जुनीचे चेतनलाल वडगाये आणि देवरीचे सभापती अनिल कुमार बिसेन उपस्थित होते.
श्री भेंडारकर पुढे बोलताना म्हणाले की, सध्या स्पर्धेचे काळ सुरू आहे, यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या पंचायतराज संस्थांना अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत या अभियानाचा लाभ पोहचविता येईल परिणामी ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे शक्य होइल असा विस्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जाखलेकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा कालावधी शंभर दिवसाचा असून 17 सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेपासून हे अभियान सुरु होइल ते 31 डिसेंबर पर्यन्त चालणार आहे. या अभियानाचं वैशिष्ट्य असे की या अभियानात मुख्यमंत्री प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. या पुरस्कार अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे अशी विनंती त्यांनी केली.
उपाध्यक्ष हर्षे म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यातील तालुके यापूर्वी विविध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.याची जाणीव सरपंचांनी ठेवून पुनःच आराखडा तय्यार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. गावांचा विकास साधण्यासाठी अधिकाऱ्यांनी पराकाष्ठा केली पाहिजे,असे ते म्हणाले. याप्रसंगी सभापती श्रीमती ढेंगे,श्रीमती कुंभरे आणि श्रीमती चंद्रिकापुरे यांनीही विचार मांडले.
दरम्यान राष्ट्रीय पंचायत अवॉर्ड अंतर्गत ग्रामपंचायत डव्वा इथं उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सडक अर्जुनीचे सभापती चेतनलाल वडगाये,जि. प. सदस्य डॉ भुणेश्वर पटले, विस्तार अधिकारी वाय. सी पटले. रवींद्र पराते,सरपंच योगेश्वरी चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी सिंधू सूर्यवंशी तसेच तिरोडा पंचायत समितीचे सभापती तेजराम चव्हाण, विस्तार अधिकारी शितेश पटले, सालेकसाचे सभापती वीणा कटरे, जि. प. सदस्य वंदना काळे, विस्तार अधिकारी के. एस. सेंदूरकर, जी. जी. मुनेश्वर, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे सहाय्यक गट विकास अधिकारी शंकर वैद्य आणि जिल्हा परिषदेच्या कविता राठोड यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. गोंदियाचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, गोरेगावचे एच. आय. गौतम आणि सडक अर्जुनीचे दिलीप खोटेले यांनी पुरस्कार मिळविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचे सादरीकरण केलं. महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा कार्यक्रम जिल्हापरिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला.
दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. वासनिक आणि सहाय्यक गटविकास अधिकारी एस. आय. वैद्य यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) एम. एम. वासनिक यांनी, संचालन विस्तार अधिकारी (संख्यिकी) वैशाली खोब्रागडे यांनी तर आभार ग्रामपंचायत अधिकारी पृथ्वीराज कोल्हटकर यांनी मानले. या प्रसंगी जिल्ह्यातील जिल्हापरिषद सदस्य, गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी,सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी सहाय्यक प्रशासन अधिकारी गुणवंत ठाकूर, पंकज पटेल, दिलीप चौधरी, सुनील चव्हाण, श्याम समरीत,ज्ञानेश्वर कानडे,प्रकाश तिराले, जगमोहन माणिकपुरी, रोहित बनसोड, सुनील साखरे, दिनेश काळसर्पे,प्रवीण गौतम, स्वेता रंगारी. मनिषा भुरे,यांनी सहकार्य केले.