ओबीसी विद्यार्थांनी हक्कासाठी लढा द्यायला सज्ज व्हावे

0
20

सालेकसा,दि.२०:गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संंघाच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी जी.के.ज्युनीयर कॉलेज कावराबांध येथे ओबीसी विद्यार्थांसाठी ओबीसींचे आरक्षण,शिष्यवृत्ती आणि अधिकार या विषयावर कार्यशाळेचे करण्यात आले होते.यावेळी कावराबांध परिसरातील तीन कनिष्ट महाविद्यालयातील सुमारे २०० च्यावर ओबीसी विद्यार्थांनी कार्यशाळेला उपस्थिती दर्शवून ओबीसींच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना विद्यार्थांनी आपल्या सवैधानिक हक्कासाठी आणि शिष्यवृत्तीसह आरक्षणासाठी लढा देण्यास सज्ज राहावे असे आवाहन डॉ.गुरुदास येडेवार यांनी केले.आज आपल्या खेड्यापाड्यातील ओबीसी बहुजन शेतकरी वर्गाची परिस्थितीत हलाखीची झाली असून शेतीच्या उत्पन्नातून मुलाबाळांना चांगले शिक्षण देता येणे कठीण झाले आहे.त्यामुळे आपल्याला शिक्षण घेण्यासाठी सविधानाने दिलेल्या आरक्षणाचा आणि शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावयाचे असेल तर त्यासाठी संघर्ष करण्याची क्षमता निर्माण करणे काळाची गरज असल्याचे विचार डॉ.येडेवार यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बी.एम.करमरकर होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणूून संघटक डॉ.गुरुदास येडेवार,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,सयोजंक खेमेंद्र कटरे,ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सावन कटरे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे संघटक कैलास भेलावे,हरिष ब्राम्हणकर,प्राचार्य मच्छिरके यांच्यासह इतर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.यावेळी बोलतांना सावन कटरे यांनी पेरीयर रामास्वामी यांच्या जंयतीचे औचित्य साधून ही कार्यशाळा घेण्यात आली असून आपणापर्यंत सविधानात आपल्यासाठी काय काय आहे हे पोचू न शकल्याने मनुवाद्याच्या दुषित प्रचाराला बळी पडून आपण आपल्याच एससी,एसटी बांधवाबद्दल गैरसमज निर्माण करुन बसल्याचे सांगत ते आपले बंधू आपण ओबीसी एससी एसटी असा ८५ टक्के समाज हा एकच असल्याचे लक्षात आणून दिले.आपल्याला लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाची तरतूद असताना फक्त २७ टक्के आरक्षण दिले गेले.त्यातही पुर्ण पदे भरली गेली नाही.आमच्या आरक्षणाच्या जागेवर उच्चवर्णीयांनी कब्जा करुन ओबीसींच्या मुलांना आयएएस,आयपीएस होण्यापासून वंचित केल्याचा आरोपही त्यांनी केला.यावेळी बबलू कटरे यांनी घटनेच्या ३४० वी कलमाची माहिती देतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहितांना ओबीसी समाजाला सर्वात आधी आरक्षणासह सर्व सोयी सवलती मिळाव्या यासाठी तरतुद केल्याचे सांगत ती माहिती आपल्यापर्यंत न पोचल्याने आपण बाबासाहेबाना चुकीचे समजून बसलो आणि ६५ वर्ष विकासापासून मागे राहिल्याचे सांगितले.बाबासाहेबाबद्दल आपल्या समाजात विषमतेचे ज्वर काही मनुवादी संघटनानी पेरुन ओबीसी विद्याथ्र्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र एका संघटनेच्या माध्यमातून चालविले आहे,तेव्हा आपण ओबीसी विद्याथ्र्यांनी खर काय आहे हे सत्यता जाणूनच निर्णय घेण्याची वेळ आल्याचे सांगितले.तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सींग यांनी फक्त मंडल आयोगाची एक अट लागू करताच आपला ओबीसी समाज एवढा जागृत आणि शिक्षित झाला आहे.जर संपुर्ण मंडल आयोगच लागू झाला तर आपला ओबीसी विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतो त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.यावेळी खेमेंद्र कटरे यांनी नॉन क्रिमिलीयरची ओबीसीवर लादलेली अट ही असैवधानिक असून ती रद्द करण्यासाठी त्याचप्रमाणे भारत सरकारची मिळणारी १०० टक्के मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती जी राज्यसरकार ५० टक्के देत आहे,ती १०० टक्के मिळाली पाहिजे तसेच ओबीसींच्या विकासासाठी ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालयाची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात प्रा.करमरकर यांनी ओबीसीनी आत्ता आपल्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली असून आज जर आपण जागे झालो नाही तर भविष्यात आपला समाज काही मनुवादी संघटना गारद करुन आपल्याला फक्त मोलमजुरी करण्यासाठी तयार आमच्या हक्काच्या पदावर उच्चवर्णीय बसतील हे लक्षात ठेवत आपल्या हक्कासाठी येत्या ८ डिसेबंरला आयोजित नागपूरच्या मोच्र्यात मोठ्या संख्येने विद्यार्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.यावेळी परीसरातील ओबीसी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी ओ.एस.गुप्ता,जे.एस.बागडे,ह.भू.पटले,आय.टी.निनावे,ललीत बनोटे व महेंद्र उके यांनी सहकार्य केले.