31.2 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ शेतात पतंग उडवताना, 10 वर्षीय अल्पवयीन मूलाचा मृत्यू

शेतात पतंग उडवताना, 10 वर्षीय अल्पवयीन मूलाचा मृत्यू

0
160
अकोला- जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथील शेतात, पतंग उडवताना एका 10 वर्षीय अल्पवयीन मूलाचा मृत्यू झाला आहे.आता पर्यंत मांज्यामुळे, अनेक घटना घडत होत्या, परंतु पतंग उडवताना मृत्यू झाल्याची, ही राज्यातील पहिलीच घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या अल्पवयीन मूलाचे नाव हे उमर शेख फकिरा असे आहे.
मुर्तिजापूर येथील शेतात, एक अल्पवयीन मूलगा पतंग उडवत होता. त्याच शेतात एक पडकी आणि उघडी विहीर होती. पतंग उडवताना भान न राहिल्यामुळे, हा मूलगा त्या विहीरीत पडला. हा मूलगा विहिरीत पडल्याची घटना गावभर पसरली. सगळे गावकरी विहिरीपाशी गोळा झाले, परंतु तेव्हा खूप उशीर झाला होता. या लहान मूलाला, शेतात पतंग उडवताना, आपला जीव गमवावा लागला आहे.
गावातील ही विहीर गेल्या अनेक वर्षांपासून, धोकादायक अवस्थेत उघडी होती. या पूर्वीही या विहीरीत जनावरे पडून मृत्यू झाले आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही, खबरदारी घेण्यात आली नाही. घटनेची माहिती मिळताच, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून, बचाव आपत्कालीन पथकाला बोलावण्यात आले. बचाव पथकाने विहिरीत उतरून, लहान मूलाचा मृतदेह बाहेर काढला आहे.
मुर्तिजापूर येथील उमर हा लहान मूलगा 5 बहिणींमधील 1 भाऊ होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात, संताप व्यक्त होत आहे. मुर्तिजापुर गावातील उघडी व असुरक्षित विहीर, मृत्यूला निमंत्रण देत असल्याचा आरोप, गावातील स्थानिक नागरिकांनी केला आहे. असून या अल्पवयीन मूलाच्या, मृत्युच्या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात अधिक तपास, अकोला पोलिस करत आहेत.

blank