31.2 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home विदर्भ पोरकी झाली राष्ट्रवादी;राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात दादांना आदरांजली

पोरकी झाली राष्ट्रवादी;राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात दादांना आदरांजली

0
71

देवरी – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने महाराष्ट्र हादरला असून देवरी शहरात शोक कडा पसरली आहे बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे एक रोखठोक नेते गेल्याने देवरीच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादी पोरकी झाली असल्याचे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजितदादाना श्रद्धांजली वाहण्याकरिता श्रद्धांजली सभेचे आयोजन दिनांक 29 रोजी करण्यात आले होते.यावेळी तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसेन यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना म्हटले की, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आता पोरका झाला. अजित दादा हे कधीच कशाला नाही न म्हणणारे गटतट न बघणारे अजात शत्रू नेते होते. “जे करता येते चांगले काम करा” अशी सूचना ते सतत देत असत. मी मान्यच करू शकत नाही की अजित दादा निघून गेले आहेत. मन सुन्न झाले आहे. मोकळ्या स्वभावाचा दिलदार व हुशार नेता महाराष्ट्राने गमावला आहे. यावेळी राष्ट्रवादी देवरी तालुक्याचे गोपाल तिवारी, भैय्यालाल चांदेवार , नेमीचंद आंबीलकर, नगरसेवक पंकज शहारे ,हिनाताई टेंभरे ,सरपंच मनोहर राऊत, माजी नगराध्यक्ष सुमनताई बीसेन,माजी पं. स. सदस्य अर्चनाताई ताराम, पार्वताबाई चांदेवार रंजन मेश्राम, यूगेश बिसेन शर्मिलाताई टेंभुरकर, लक्ष्मीबाई मेश्राम, यशवंत शिवणकर, मीनाताई कुंभरे, श्रावण बिंजलेकर, रवींद्र मेश्राम, रवी बडवाईक पुष्पा मस्के उपस्थित होत्या.

blank