गोंदिया : जिल्हा परिषदेचा सन २०२५-२०२६ चा सुधारीत ४८ कोटी ७३ लाख ७६ हजार ०८९ रुपये व २०२६-२७ चा २२ कोटी ३३ लाख ५५ हजार ७३१ रुपयांच्या संभाव्य खर्चाचा अर्थसंकल्प जि.प.अर्थ सभापती डाॅ.लक्ष्मण भगत यांनी (दि.०९) सभागृहात सादर केला.
अर्थसंकल्पात महिला बालकल्याण, समाजकल्याण, पाणी पुरवठा आणि कृषी विषयक योजनांवर तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी १ वाजता जि.प.च्या स्व.वसंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरू सुरवात झाली. जि.प. बांधकाम तथा अर्थ सभापती डाॅ.लक्ष्मण भगत व मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी दुपारी १ वाजता अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपा चंद्रिकापुरे, महिला बालकल्याण सभापती पौर्णाम ढेंगे, समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरंगनथन,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी फनेंद्र कुतीरकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
या अर्थसंकल्पात समाज कल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा,शेतीसाहित्य, महिला व बाल कल्याण व दिव्यांग कल्याणासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली.जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणारा निधी १२.लाख रुपये करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे २५-२६ या आर्थिक वर्षातील सुरुवातीची शिल्लक धरून व प्राप्त उत्पन्ननाचे आधारे सुधारित उत्पन्न २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ४८ कोटी ७३ लाख ७६ हजार ०८९ रुपये एवढे करण्यात आले. तर संभाव्य २०२६-२७ संभाव्य उत्पन्न २२ कोटी ३३ लाख ५५ हजार ७३१ रुपये निर्धारित करण्यात आले आहे.
समाजकल्याण विभाग,मागासवर्गीयांच्या कल्याणसााठी योजनेकरीता जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून २० टक्के .१ कोटी ९ लाख १०.हजार १०० रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के निधी अंतर्गत..१७ लाख ५०.हजार रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकरीता २० टक्के निधीतून ९० लाख, महिला बालकल्याण विभागाकरीता १० टक्के निधीतून १ कोटी १७ लाख ६० हजार तर शिक्षण विभागाकरीता ५ टक्के निधी अंतर्गत.३ कोटी १४ लाख ८० हजार १० रुपयाचा निधीची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पात २०२६-२७ च्या एकुण अंदाजित उत्पन्न व सुरवातीच्या शिल्लक धरून २२ कोटी ३३ लाख ५५ हजार ७३१ रुपये एवढा निधी आहे.त्याप्रमाणे सण २०२६-२७ या अर्थसंकल्पात बांधकाम विभागाकरीता ३ कोटी ७७ लाख ४० हजार ०५० रुपये , शिक्षण विभागाकरीता ३ कोटी १४ लाख ८० हजार ०१० रुपये, आरोग्य विभागाकरीता ७६ लाख ८० हजार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकरीता ९० लाख, समाजकल्याण विभागाकरीता .१ कोटी ९ लाख १० हजार १०० रुपये, दिव्यांग कल्याणासाठी १७ लाख ५० हजार, महिला बालकल्याण विभागाकरीता १ कोटी १७ लाख ६० हजार , कृषी विभागाकरीता ८२ लाख.११ हजार १०० रुपये, पशुसंवर्धन विभागाकरीता ६५ लाख १० हजार, सामान्य प्रशासन विभागाकरीता २ कोटी ९६ लाख ५० हजार ०९० रुपये , वित्त विभागाकरीता ६३ लाख ८० हजार ०२० रुपये, पंचायत विभागाकरीता ४ कोटी १८ लाख ६० हजार ०१० रुपये , लघु पाटबंधारे विभागाकरीता १ कोटी ४२ लाख रुपयाचा निधीची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती सभापती डाॅ.लक्ष्मण भगत व मुख्य लेखा वित्त अधिकारी जनार्दन खोटरे यांनी सभागृहाला दिली.





