26.3 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ भारत आणि अफगाणिस्तानाणे सम्राट अशोकांचा शांतीचा मार्ग अंगीकारावा-अध्यक्ष भावे यांचे प्रतिपादन

भारत आणि अफगाणिस्तानाणे सम्राट अशोकांचा शांतीचा मार्ग अंगीकारावा-अध्यक्ष भावे यांचे प्रतिपादन

0
97

सम्राट अशोक जयंती उत्साहात
गोंदिया ता. 27:-सम्राट अशोकांची सत्ता ही भारत आणि अफगाणिस्तानात सर्वदूर विस्तीर्ण होती.कलिंग युद्धानंतर अशोकाने शांतीचा मार्ग स्वीकारला,आता जगात भीषण युद्ध सुरु असताना भारत आणि अफगाणिस्तान हे प्रबळ देश युद्धापासून दूर आहेत.या दोन्ही देशांनी सम्राट अशोकांच्या शांतीचा मार्ग असाच कायम ठेवावा असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद भावे यांनी( ता. 26) केले. जयंती समितीच्या वतीने छोटा गोंदिया येथे बोधिसत्व बुद्धिविहारात आयोजित सम्राट अशोक यांच्या जयंती प्रित्यर्थ कार्यक्रमात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. मंचावर माजी अध्यक्ष अनंत टेम्भूरकर, नानाजी शेंडे, प्रा. सुरेश नंदेश्वर उपस्थित होते.
श्री भावे पुढे बोलताना म्हणाले की, तथागत बुद्धांच्या काळात,रोहिणी नदीच्या पाणी वितरण समस्यामुळे शाक्य आणि कोलीयात युद्ध पेटणार होते. हे युद्ध होऊ नये आणि शांती व्यवस्था कायम राहावी म्हणून तथागत बुद्धाने गृहत्याग केला होता. सम्राट अशोकानेही कलिंग युद्ध जिंकल्यानंतर, त्यांचे मन हिंसाचारामुळे व्यथित झाले. परिणामी त्यांनीही तथागत बुध्दाचा मार्ग अंगीकारला. तेव्हा जगात युद्ध सुरु असताना बुध्दाच्या विचाराने शांती व्यवस्था कायम होईल,असा ठाम विश्वास श्री भावे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी बोलताना माजी अध्यक्ष श्री शेंडे म्हणाले की,युद्धामुळे जणहानी, वित्तहानी, निषर्ग आणि पर्यवरणाचीही हानी होते,युद्धामुळे काहीही निष्पन्न होत नाही, तेव्हा सम्राट अशोकांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी हे युद्ध बंद झाले पाहिजे, अशी विनंती श्री शेंडे यांनी केली.
तथागत बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्रांना माल्यार्पण करुण कार्यक्रमांची सुरुवात झाली.हमे भारत पर नाज चाहिये – देश मे सम्राट अशोक का राज चाहिये आदी घोषणा देण्यात आल्या.सुशील गणवीर यांच्याकडून, शहरातील बोधिसत्व बुद्धविहार,धम्म जणणी बुद्ध विहार, आनंद बुद्ध विहार आणि चैतन्य बुद्धिविहारात सम्राट अशोकांचे तैलचित्र भेट देण्यात आले.या प्रसंगी मिठाई वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी केलं, संचालन सुशील गणवीर यांनी तर मच्छिन्द्र भेलावे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी,जयंती समितीचे कार्यकर्ते अंकुर गजभिये, विलास वासनिक, पंकज वासनिक, इंजिनिअर छोटू बोरकर, संजय वाहने, डॉ. राजेश उके, नूरलाल ऊके, सुशील गणवीर, संतोष शामकुमार, सुनील डोंगरे,अशोक कांबळे, एन. एल. मेश्राम. एड. एकता गणवीर, सुनील मेश्राम, ऍड अंजली (चव्हाण ), पौर्णिमा रामटेके, किशोर रामटेके, धनंजय मेश्राम, नरेंद्र मेश्राम स्टडी पॉईंट, नरेश उके,सुनील मेश्राम, ओमप्रकाश मेश्राम, ठुनाजी उके यांनी सहकार्य केले.