30.6 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home विदर्भ डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळेत ” टास “मोहिमेचे जिल्हास्तरीय उदघाटन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळेत ” टास “मोहिमेचे जिल्हास्तरीय उदघाटन

0
66

गोंदिया- राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग समुदाय संक्रमण सर्वेक्षण मोहीम (टास) जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये गोंदिया,तिरोडा,अर्जुनी/मोरगाव व गोरेगाव येथे दि. 13 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान राबविण्यात येत आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार दि.13 एप्रिल रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारेनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळेत  टास  मोहिमेचे जिल्हास्तरीय उदघाटन  झाले.जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.समाधान देबाजी यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,प्रभारी गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.येळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.सलील पाटील,आरोग्य पर्यवेक्षक किशोर भालेराव व शाळेचे मुख्याध्यापक अंबुले उपस्थित होते.यावेळी उद्घाटन कार्यक्रमास शहरी विभागातील आशा सेविका,हिवताप कार्यालय व आरोग्य विभागाचे आरोग्य कर्मचारी व शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

लिम्फॅटिक फिलेरियासिस (हत्तीरोग) निर्मूलनासाठी ट्रान्समिशन असेसमेंट सर्व्हे (टास) ही जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेली एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रात आणि भारतात हत्तीरोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.

दि.13 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान गोंदिया,तिरोडा,अर्जुनी/मोरगाव व गोरेगाव ह्या चारही तालुक्यांतील 221 गावांमध्ये हत्तीरोग समुदाय संक्रमण सर्वेक्षण मोहीम (टास) राबवण्यात येणार असून सँपल सर्वेतुन जवळपास 4107 सहा ते सात वर्षे मुले व मुंलीची रक्त तपासणी करण्यात येऊन हत्तीरोग जंतूंचा प्रभार किती प्रमाणात आहे याबाबतचे विश्लेषण आकडेवारी संकलीत होणार असल्याची माहिती डॉ.विनोद चव्हाण यांनी या प्रसंगी दिली.सदर टास सर्वेक्षण मुल्याकंन आकडेवारी वरून सामुदायिक औषध उपचार मोहीम राबविण्यात येणार किंवा नाही याबाबतची माहिती मिळण्यास सुलभ होणार आहे.

आजही पूर्वीच्या हत्तीरोग प्रवण भागात हत्तीरोगाचे संक्रमण सुरू आहे याची पडताळणी करण्याचा शास्त्रशुद्ध मार्ग म्हणजे टास.गोंदिया जिल्ह्यात वर्ष 2005 पासून एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेचे यशाचे मूल्यमापन करण्यासाठी टास सर्वेक्षण केले जाते.औषधोपचार मोहीम चालू ठेवणे किंवा बंद करण्याचे निर्णय टासवर अवलंबून आहे.टास मोहीम राबवताना गुणवत्तापूर्वक सर्वेक्षण व जनजागृती करण्याचे आव्हान डॉ.समाधान देबाजी यांनी केले.

टास सर्वेक्षणामध्ये जिल्हास्तरावरुन आरोग्य प्रशासनामार्फत 28 पथक निर्माण करण्यात आले असुन त्यात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आशा सेविका यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.मोहिमे दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचे सह आरोग्य पर्यवेक्षक यांचे द्वारे पर्यवेक्षण करण्यात येणार आहे.

१. टास म्हणजे काय?

जेव्हा एखाद्या भागात सलग ५-६ वर्षे मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (MDA) म्हणजेच हत्तीरोग प्रतिबंधक गोळ्या वाटप मोहीम यशस्वीपणे राबवली जाते (ज्यामध्ये ६५% पेक्षा जास्त लोक औषध घेतात)त्यानंतर त्या भागात या आजाराचा प्रसार थांबला आहे की नाहीहे तपासण्यासाठी टास सर्वे केला जातो.

२. टास चा मुख्य उद्देश –

  • प्रसार थांबला आहे याची खात्री करणे: नवीन संसर्ग (Infection) होणे थांबले आहे का ते तपासणे.
  • गोळ्या वाटप थांबवण्याचा निर्णय: जर टास चा निकाल सकारात्मक आलातर त्या भागात गोळ्या वाटप मोहीम थांबवता येते.
  • बालकांवर लक्ष केंद्रित करणे: साधारणपणे ६ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हा सर्व्हे केला जातोकारण त्यांच्यातील संसर्ग हा अलीकडील काळातील संसर्ग दर्शवतो.

३. टास कसा केला जातो?

  • ब्लड टेस्ट (FTS – Filariasis Test Strip): मुलांच्या रक्ताची चाचणी करून शरीरात सूक्ष्म परजीवी आहेत का ते तपासले जाते.
  • निकाल: जर ठराविक मुलांच्या संख्येत संसर्ग आढळला नाहीतर तो भाग हत्तीरोग मुक्त मानला जातो.
  • पुनरावलोकन: जर संसर्ग जास्त आढळलातर एम.डि.ए. पुन्हा सुरू करावी लागते.

थोडक्यात सांगायचे तरटास म्हणजे हत्तीरोगाच्या गोळ्या बंद करण्यापूर्वी तो आजार त्या भागात संपला आहे याची खात्री करणारी चाचणी होय.