23.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत दवडीपारचा स्तुत्य उपक्रम: अंगणवाडीमध्ये सीबीएससी अभ्यासक्रमाचा शुभारंभ!

ग्रामपंचायत दवडीपारचा स्तुत्य उपक्रम: अंगणवाडीमध्ये सीबीएससी अभ्यासक्रमाचा शुभारंभ!

0
3

गोरेगाव:ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने ग्रामपंचायत दवडीपार यांच्या विशेष पुढाकाराने दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी अंगणवाडी ३ मध्ये ‘सीबीएससी’ (CBSC) अभ्यासक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती सी. एम. मेंढे (बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प, गोरेगाव) यांच्या शुभहस्ते पार पडले. ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये अशा प्रकारचा आधुनिक अभ्यासक्रम सुरू झाल्याबद्दल त्यांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. एम. कटरे (सरपंच, ग्रामपंचायत दवडीपार) हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून साहेबलाल रमेश बिसेन (उपसरपंच),श्रीमती कांताताई सापरकर (पर्यवेक्षिका),श्री कोटांगले (अधीक्षक),या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून अंगणवाडीतील बालकांना व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अंगणवाडीतील चिमुकल्यांना आतापासूनच सीबीएसई पॅटर्ननुसार शिक्षण मिळणार असल्याने पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी दवडीपार ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद ठरत आहे.