25.2 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ  रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन 21 ऑगष्टला गोंदियात

 रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन 21 ऑगष्टला गोंदियात

0
1

 गोंदिया, दि.20 : मानवी जीवनामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. रानभाज्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक, जीवनसत्वे व खनिजे आणि औषधी गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. सकस आहारामध्ये विविध रानभाज्यांचा/फळांचा समावेश करणे आवश्यक आहे. सद्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रानातील भाजी तसेच शेतशिवारातील उगवल्या जाणाऱ्या भाज्याचे आहारातील महत्व व औषधी गुणधर्माबाबत व आरोग्य विषयक माहिती सर्वसाधारण नागरिकांना होण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय रानभाजी प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने शुक्रवार दि.21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत नविन प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक, गोंदिया येथे करण्यात आले आहे. सदर रानभाजी महोत्सवात सर्व नागरिक, शेतकरी बांधव, अधिकारी/कर्मचारी, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्याथीनी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी गोंदिया नेहा आढाव यांनी केले आहे.