23.5 C
Gondiā
Sunday, August 30, 2026
Home विदर्भ रिअल लाईफ ‘भंवरसिंह शेखावत’ देसाईगंजात! पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांची ‘पुष्पा’ स्टाईल...

रिअल लाईफ ‘भंवरसिंह शेखावत’ देसाईगंजात! पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांची ‘पुष्पा’ स्टाईल चर्चा

0
19

“**” ‘मैं झुकेगा नहीं’ म्हणणाऱ्या पुष्पाला टक्कर देणारा अधिकारी आता देसाईगंज शहरात”*

*गडचिरोली (देसाईगंज): विष्णू वैरागडे दि. ३० :*दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा’ मधील अल्लू अर्जुनचा ‘मैं झुकेगा नहीं साला’ हा डायलॉग जसा गाजला, तसाच त्या चित्रपटात पुष्पाला टक्कर देणाऱ्या आयपीएस अधिकारी *भंवरसिंह शेखावत* अर्थात अभिनेता फहाद फासिलचा राकट आणि रुबाबदार लूकही प्रेक्षकांच्या मनावर ठसला होता. आता तोच लूक प्रत्यक्षात गडचिरोलीच्या देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळत आहे.
देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक *स्वप्नील इज्जपवार* हे हुबेहूब भंवरसिंह शेखावतची ट्रू कॉपी भासत आहेत. डोक्यावर सफाचट केस, मिश्यांची खास ठेवण, दणकट शरीरयष्टी आणि चेहऱ्यावरची जरब यामुळे पुष्पा चित्रपट पाहिलेली कोणतीही व्यक्ती इज्जपवार यांना पाहून क्षणभर अचंबित झाल्याशिवाय राहत नाही. “चित्रपटातला भंवरसिंह इकडे कुठे आला?” असा प्रश्न पडावा एवढे साम्य आहे. सध्या देसाईगंज शहरात त्यांच्या या ‘लूक’चीच जोरदार चर्चा आहे.
एका फटक्यात १५ माणसांना उडवणारा अभिनेता केवळ चित्रपटामधला हिरो असतो. पण प्रत्यक्ष माओवादग्रस्त जिल्ह्यात कर्तव्यरत असणारे पोलिस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार हे रियल हिरो आहेत.सन २०१० च्या बॅचमधून पीएसआय म्हणून निवड झालेल्या स्वप्निल इज्जपवार पहिल्यांदा एटापल्ली तालुक्यात रूजू झाले होते.या भागात २०११ ते २०१४ पर्यंत त्यांनी कसनसूर आणि हेड्री या दोन पोलिस ठाण्यांत सेवा बजावली. हेड्री पोलिस चौकीचे बांधकाम सुरू असताना माओवाद्यांनी पोलीस चौकीवर मोठा हल्ला केला होता.त्यावेळी तो हल्ला परतवून लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये स्वप्निल इज्जपवार हे देखील होते.त्यानंतर त्यांनी वाशी नवी मुंबई (२०१४), पनवेल शहर (२०१७- १९), नेरूळ (२०१९-२१) व त्यानंतर सोलापूरच्या बार्शीनंतर २०२४ मध्ये अहेरी येथे रुजू झाले. येथे रुजू होताच पहिल्या दोन दिवसांत त्यांनी मोठा दारू साठा जप्त केला होता. त्यानंतर प्रशासकीय कारणास्तव ते सन २०२४-२६ गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात होम डीवाय‌एसपी म्हणून काम बघीतले. त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी देसाईगंज येथे जबाबदारी टाकली आहे.

*रूबाब तोच, स्वभाव मात्र शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख*

दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’ मधील अभिनेता फहाद फासिल यांनी साकारलेला एसपी भंवर सिंह शेखावत हा एक अत्यंत आक्रमक, धोरणी आणि खतरनाक आयपीएस अधिकारी व खलनायक आहे.त्याचा वरवरचा शांत पण आतून धगधगणारा स्वभाव,राकट व रुबाबदार लूक मनावर छाप पाडते.त्याला स्वतःच्या अधिकाराचा आणि पदाचा मोठा अहंकार आहे.कुणीही आपल्यासमोर मान झुकवावी, अशी त्याची अपेक्षा ठेवणारा ताठर स्वभाव आहे.तो जितका हुशार आणि रणनीती आखणारा आहे, तितकाच तो आपल्या शत्रूंवर चक्र चालवण्यात निर्दयी आणि धुर्त आहे. चित्रपटाच्या शेवटी त्याचे व पुष्पा राजचे अर्थात अल्लू अर्जुनशी झालेले खटके उडवणारे संवाद आणि संघर्ष त्याच्या भयंकर आणि तगडी टक्कर देणारा जिद्दी स्वभावाची ओळख करून देतो.
दाक्षिणात्य पुष्पा’ चित्रपटातील भंवरसिंह शेखावत हा अहंकारी, आक्रमक आणि ताठर स्वभावाचा खलनायक अधिकारी होता. मात्र वास्तवात पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार हे दिसायला तसे असले तरी स्वभावाने अत्यंत शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून पोलीस दलात त्यांची ख्याती आहे.आता देसाईगंज तालुक्यात वाढलेले अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी हा ‘रिअल लाईफ भंवरसिंह’ आपल्या *”सद् रक्षणाय खल् निग्रहणाय”* या ब्रीदवाक्यानुसार कशी छाप पाडतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.