तिरोडा: धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित आणि अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांच्या नेतृत्वात तसेच तिरोडा तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालू) बावनथडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.या निवेदनाद्वारे शेती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी आग्रही विनंती करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:धानाला त्वरित बोनस: धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित धानाला बोनस जाहीर करावा.१२ तास वीज पुरवठा: शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा अथवा सलग व सुरळीत १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा.स्मार्ट मीटर योजना रद्द करा: शेतकरी व सामान्य नागरिकांवर अन्यायकारक ठरणारे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तातडीने थांबवावे.वन्यजीवांचा बंदोबस्त: पिकांची प्रचंड हानी करणाऱ्या रानडुकरांचा व इतर वन्यजीवांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र भगत, तिरोडा तालुका अध्यक्ष जगदीश (बालू) बावनथडे, युवक तालुका अध्यक्ष आशिष चौधरी, बिरसीचे सरपंच श्यामाभाऊ शरणागत, केसलेवाडाचे माजी सरपंच बबन कुकडे, लाखेगावचे ग्रा.पं. सदस्य मुन्नालाल बिंझाडे, तंटामुक्त अध्यक्ष टेकलाल सोनेवाने, माजी युवक अध्यक्ष खुमेंद्र (विक्कीभाऊ) रहांगडाले, विजयजी बारापात्रे, सोनुभाऊ टेंभेकर, बबलू कावळे, आशुभाऊ पटले, रोहित बोळणे व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





