गोंदिया: गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पत संस्था मर्यादित, गोंदिया (र. नं. १०२) ची सन २०२५-२०२६ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा (आमसभा) रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही सभा दुपारी ११.०० वाजता ‘शुभमंगलम हॉल व लॉन’, सालेकसा रोड आमगाव, ता. आमगाव, जिल्हा गोंदिया येथे पार पडणार आहे.
संस्थेच्या वतीने सर्व सभासदांना सभेची अहवाल पुस्तिका कार्यालयामार्फत पोहोचवण्यात आली आहे. ज्या सभासदांना काही कारणास्तव ही अहवाल पुस्तिका मिळाली नसेल, त्यांनी या सूचनेलाच सभेची नोटीस समजून आमसभेला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापक समितीच्या वतीने संस्थेचे सचिव कमलेश बिसेन यांनी केले आहे.





