७० हजारांची अवैध वाळू जप्त

0
10

सालेकसा दि. 15 :: तालुक्यातील कोटजमुरा येथे एका शेतात वाळूचा अवैधरित्या केलेला साठा महसूल विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर तहसीलदार प्रशांत सागळे यांनी ७० हजार रुपये किमतीची ३५ ट्रीप वाळू जप्त केली. या जप्तीच्या कारवाईमुळे स्थानिक ट्रॅक्टर मालकांचे व संबंधित काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मागील काही दिवसांपासून परिसरातील नदी नाल्यावरील वाळुचा उपसा करुन ट्रॅक्टर धारक रात्रीच्यावेळी अवैध वाळू वाहतूक करुन विक्री करण्याची तक्रार महसूल विभागाकडे काही लोकांनी केली. यावरुन महसूल विभागाने तक्रारीची सत्यता तपासली असता कोटजमुरा येथील एका शेतकऱ्याच्या शेतीत ३५ ट्रीप वाळूचा साठा दिसून आला. ही बाब तहसीलदाराच्या लक्षात आणून दिले असता तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी त्या स्थळी जावून जप्तीची कारवाई केली.