24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home महाराष्ट्र उपायुक्त चंद्रकात गुडेवारांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय

उपायुक्त चंद्रकात गुडेवारांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय

0
27

पुणे, दि. 15 – अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांचं अवमान प्रकरणी गुडेवारांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे नाराज झालेल्या चंद्रकांत गुडेवारांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. गुडेवार सध्या पुण्यात ग्रामीण विकास विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार अमरावतीमध्ये आयुक्त असताना चंद्रकांत गुडेवार यांनी विधानसभा सदस्य डॉ. सुनील देशमुख यांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता. यासंबंधीचा अहवाल गुरुवारी सभागृहाने स्विकारला.

blank