ओबीसी विद्यार्थी संघटनेच्या बैठीत विविध समस्यांवर मंथन

0
16

गडचिरोली: येथील जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयात १५ जानेवारी रोजी सायंकाळी ओबीसी विद्यार्थी संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध समस्यांवर विचारमंथन करण्यात आले.
बैठकीला ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष अरूण पाटील मुनघाटे, ओबीसी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रूचित घनश्याम वांढरे, प्रा. शेषराव येलेकर, साईनाथ जेंगठे, विदर्भ न्यूज एक्सप्रेसचे संपादक मनिष कासर्लावार, प्रितम ठाकरे, साईनाथ जेंगठे, बादल गडपायले, दादाजी चापले, अक्षय ठाकरे, दादाजी चुधरी , शिवणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. शेषराव येलेकर यांनी ओबीसी जनगणना, स्वतंत्र मंत्रालय, क्रिमिलेयर प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी, ओबीसी स्काॅलरशिप व फ्रिशीप १०० टक्के मिळण्यासाठी प्रयत्न, गडचिरोली जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. अरूण पाटील मुनघाटे यांनी प्रत्येक तालुक्यात विद्यार्थी संघटनेची बांधणी करण्याचे आवाहन केले. यावेळी पंकज धोटे यांची वडसा तालुका ओबीसी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विक्की तोंडरे आरमोरी तालुकाध्यक्ष, उमेश गजलपल्लीवार यांची चामोर्शी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूचित वांढरे यांनी केले. आभार संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अक्षय ठाकरे यांनी मानले.