23.9 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वाटप

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस वाटप

0
27

तिरोडा,berartimes.com दि.२:तालुक्यातील कोडेलोहारा येथे पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते १00 लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला प्रामुख्याने पं.स. सदस्य माया रहांगडाले, नागझिरा वनपरिक्षेत्राधिकारी संदीप गव्हारे, भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष भुमेश्‍वर रहांगडाले, सांकेशा गॅस एजन्सीचे संचालक प्रभाकर भोयर, व्यवस्थापक रवी गुरव, सरपंच देवीका उईके, उपसरपंच सिद्धार्थ खोब्रागडे, सा. कार्यकर्ता कमलप्रसाद गेडाम, प्यारेलाल पटले, बसंता सोनवाने सचिव के.डी. रंगारी, सरिता बघेले व मोठय़ा संख्येने गावकरी व लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चैतन्य उरकुडे यांनी तर आभार मोहन उईके यांनी मानले.