प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदल्याबाबत केंद्राच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही- चंद्रकांत पाटील

0
14

मुंबई,दि.8:भंडारा येथील प्रकल्पांकरिता संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला वाढीव दराने देण्यासाठी केंद्र शासनाशी चर्चा करून केंद्राच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांनी भंडारा येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. श्री. पाटील म्हणाले की, शासनाच्या 27 एप्रिल 2016 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने केंद्र शासनाने 14 जून 2016 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने भूसंपादन अधिनियम 1894 नुसार कार्यवाहीत असलेल्या प्रलंबित प्रकरणांचे संपूर्ण प्रकरणांचे तपशीलासह केंद्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे संदर्भ
करण्याचे कळविले आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे माहितीसह संदर्भ करण्यात आले आहे.