23.9 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ कामठा येथे सिलेंडरच्या स्पोटात दोन घरे जळाली

कामठा येथे सिलेंडरच्या स्पोटात दोन घरे जळाली

0
21

गोंदिया,दि.१२(berartimes.com)-गोंदिया तालुक्यातील कामठा येथे आज बुधवारला सायकांळच्या सुमारास सिqलडरच्या स्पोटात दोन घरे जळाल्याची घटना घडली.सविस्तर असे की कामठा येथील राध्येशाम भावे,मुन्ना भावे, राजाराम भावे,घनश्याम भावे,मेघराज भुते हे एकाच कुटुंबात राहत होते.यांच्या कुुटुंबात ३२ सदस्यांची संख्या असून आज सायकाळी पाच वाजेच्या सुमारास घरातील सिqलडरचा स्पोट झाल्याने घरातील ३० qक्वटल धान,२० qक्वटल तांदूळ,दागिणे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे यासह इतर वस्तु जळाल्याची घटना घडली.जवळच असलेल्या बिरसी विमानतळावरील अग्निशामक गाडीला दुरध्वनीवर माहिती देण्यात आली.त्यानंतर गोंदिया नगरपरिषदेच्या अग्निशामक गाडीला माहिती देण्यात आली.परंतु दोन्ही गाड्या येईपर्यंत संपुर्ण घराची राखरागंोळी झाली होती.ही आग आटोक्यात आणण्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुशील खरकाटे,सुरेंद्र खरकाटे,सावलराम महारवाडे,नरेंद्र मस्करे,विजय लिल्हारे,मनिष लिल्हारे,गणेश लिल्हारे यांनी सहकार्य केले.