
चंद्रपूर दि.21- चंद्रपूर महानगरपालिकेच्या दुस-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून येथील जिल्हा क्रीडा संकुलात सुरु झाली. दरम्यान संध्याकाळपर्यंत महानगरपालिकेचे बहुतांश निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोन्ही मंत्र्यांची या निवडणूक निमित्याने प्रतिष्ठापणाला लागली आहे.