ओबीसी सघंर्ष कृती समितीची जिल्हा बैठक उद्या

0
10
गोंदिया,दि.21 : गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघ गोंदिया जिल्हाद्वारा ११ एप्रिल ते १० मे २०१७ दरम्यान ‘ओबीसी सदस्यता नोंदणी अभियान’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अभियानाची अचुक अंमलबजावणी व्हावी व सर्वांचा सहभाग असावा, याकरीता शनिवार २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता विश्रामगृह गोंदिया येथे जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सभेत आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा, नोंदणी १०० टक्के होणेसंदर्भात कृती कार्यक्रम व सामुग्री वितरण होणार आहे. सर्व जबाबदार जिल्हा व तालुका पदाधिकारी, ओबीसी व इतर सामाजिक चळवळीत काम करणारे समस्त कार्यकर्त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बबलू कटरे व आयोजकांनी केले आहे.