किडंगीपार मध्ये बिअरबारला विरोध

0
8

आमगाव,दि.21- गेल्या 15 दिवसांपासून किडंगीपार येथे बिअरबार सुरू होऊ नये म्हणून गावातील महिलांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. गावात आयोजित ग्रामसभेत आक्रोश केल्यानंतर महिलांनी मुकाअ , जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधीक्षक यांच्या नावे निवेदन तयार करून त्यांना निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत.

किडंगीपार हे गाव व्यसनमुक्त असावे, यासाठी आता गावातील महिलांनी कंबर कसली आहे. किडंगीपार येथे बिअरबार तर रिसामा येथे देशी दारू दुकान सुरू होऊ नये यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. रिसामा येथील देशीदारू दुकानासाठी ग्रामपंचायतीच्या  पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. परंतु, किडंगीपारकरीता ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे. मात्र, गावकरी बिअरबारला घेऊन आक्रोश व्यक्त करीत आहेत. गावात बैठका घेवून बिअरबार सुरू होऊ नये, यासाठी महिलांचा प्रयत्न सुरू आहे. या बिअरबारच्या विरोधात महिलांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात दारूबंदी समितीच्या अध्यक्ष सुषमा कोरे, उपाध्यक्ष कांता रहिले, सचिव किरण चुटे, सेवंता भांडारकर, सरस्वता फाये, भूरण वाकले, चुन्नेश्वरी हरिणखेडे, मंगला बहेकार, जिजा भांडारकर, विनोद कोरे, रामेश्वर भांडारकर, कांता मेंढे आदींचा समावेश होता