दहा गावांतील शेतकरी आत्महत्येच्या तयारीत

0
15
मोबदला न देता रेल्वेची टॉवरलाईन : जिल्हाधिकाºयांनी काढला फतवा
गोंदिया,दि.23 : चंद्रपूर रेल्वे लाईनवर गाड्या येत्या दिवसांत विद्युतवर धावणार आहेत. त्याकरिता एमआयडीसी मुंडीपार ते हिरडामाली दरम्यान उच्च विद्युत क्षमतेचे टॉवर बसविण्यात येणार आहेत. कसल्याही प्रकारचा मोबदला न देता हिटलरशाहीचा वापर करत टॉवर बसविण्याच्या तयारीत आहेत. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी १४ एप्रील रोजी निर्णय दिला. आधी मोबदल्याची रक्कम ठरवा, त्यानंतर काम सुरू करा. अन्यथा बळजबरी केल्यास १० गावांतील २२ कुटुंबांतील शेतकरी आत्महत्या करणार असल्याचा इशारा शेतकरी नेते संजय टेंभरे यांनी दिला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते शनिवारी बोलत होते. संजय टेंभरे म्हणाले की, एमआयडीसी मुंडीपार ते हिरडामाली दरम्यान उच्च दाबाची विद्युत लाईन टाकण्याला २०१५ मध्ये मंजुरी बहाल करण्यात आली. दरम्यान हे काम रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रविद्युत पारेषण कंपनीला देण्यात आले. या कंपनीने हे काम देशमुख कंपनीला कंत्राटी तत्वावर दिले. जवळपास १० गावांतील शेतकº्यांच्या शेतातून ही टॉवर लाईन जाणार आहे. त्यामुळे शेतातील पीक बाधित होणार आहे. सोबतच शेतकरी आणि जनावरांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. शेतकº्यांची संमती जाणून घेण्याकरिता सात दिवसांपूर्वी नोटिस देणे गरजेचे आहे. परंतु, नोव्हेंबर २०१५ मध्ये शेतकº्यांना नोटिस देण्यात आले. आणि त्यांचे म्हणणे जाणून न घेताच दुसº्याच दिवशी मोजमाप आणि टॉवर बसविण्याचे काम सुरू झाले. यासंदर्भात रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे मोबदल्याकरिता शेतकर्यांनी चकरा मारल्या. नागपूर येथे झालेल्या बैठकीत रेल्वेच्या अधिकार्यांनी प्रती टॉवर दोन लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र, प्रती टॉवर १० लाख रुपये देण्यात यावे, अशी मागणी शेतकº्यांची होती. ती मागणी फेटाळून लावत रेल्वे प्रशासनाने आपले काम सुरू ठेवले. एमआयडीसी मुंडीपार ते हिरडामाली रेल्वे स्थानकादरम्यान ६४ टॉवर बसविण्यात येणार आहेत. त्यातील २२ टॉवर शासनाच्या जमीनीत लावण्यात येणार आहेत. उर्वरित ४२ टॉवर शेतकº्यांच्या शेतात लावण्यात येणार आहेत. मोबदल्याच्या विषयाला घेवून जिल्हाधिकारी अविनाश काळे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी रेल्वे प्रशासन आणि शेतकरी यांची बाजू ऐकून घेतली. असे असताना देखील जिल्हाधिकारी यांनी १४ एप्रील रोजी एकतर्फा निर्णय दिला. त्यात शेतकº्यांनी टॉवर बसविण्याला विरोध करू नये, महिनाभरात मोबदला देण्यात येईल. विरोध केल्यास पोलिसांच्या बंदोबस्तात टॉवर बसविण्यात येतील असे म्हटले. परंतु, किती मोबदला मिळेल, हेस्पष्ट केले नाही. त्यामुळे शेतकº्यांवरील अन्याय अजून वाढला आहे. याविरोधात न्यायालयात शेतकरी दाद मागणार आहेत. त्यापूर्वी जिल्हा पÑशासनाने मुजोरी केल्यास १० गावांतील २२ कुटुंबांतील शेतकरी सामुहिक आत्महदन करतील, त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा संजय टेंभरे यांनी दिला. यावेळी राजकुमार रहांगडाले, रतन बघेले, बुधाजी भगत, चैतराम भगत, अनिल रहांगडाले, डिगेंद्र रहांगडाले, देवेश रहांगडाले, तुलाराम दिहारी, पप्पू ठाकरे, उत्तम भगत, सुनिल ठाकरे, सुनिल टेंभरे, चंदन पंधरे, गजानन रहांगडाले, रेखा ठाकरे आदी शेतकरी उपस्थित होते.
——ते म्हणतात पीक उध्वस्त करू—
ज्या गावांतून टॉवर गेले आहेत. त्या गावांतील काही शेतकº्यांनी रब्बी हंगामात धान पिकाची लागवड केली. त्या ठिकाणी टॉवर बसविण्याचे काम प्रस्तावित आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानंतर काम करणाº्या कंत्राटदाराचे लोक शेतकº्यांकडे जावून तुम्ही मुकाट्याने काम करू द्या अन्यथा उभे पीक उध्वस्त करू, अशी धमकी देत असल्याची माहिती संजय टेंभरे यांनी दिली.