24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा रविवारला

कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा रविवारला

0
25

सालेकसा,दि.22-साकरीटोला  युवा कुणबी समाज सेवा समिती साकरीटोलाच्या वतीने रविवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ११.0५ वाजता जि.प.हायस्कूलच्या पटांगणावर कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्य़ात आठ जोडप्यांचे शुभमंगल होणार असून यावेळी खा. प्रफुल्ल पटेल, खा. नाना पटोले, आ.गोपालदास अग्रवाल, आ.संजय पुराम, महादेवराव शिवणकर, भरतभाऊ बहेकार, जि.प.अध्यक्षा उषा मेंढे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, राजेंद्र जैन, रामरतन राऊत, केशवराव मानकर, भेरसिंह नागपुरे, विजय शिवणकर, नरेश माहेश्‍वरी, देवराज वडगाये, लता दोनोडे, जियालाल पंधरे, सुखराम फुंडे, हिरालाल फाफनवाडे, हेमलता डोये, संगीता कुसराम, टोलसिंग पवार, प्रमोद येटरे, लीलाधर पाथोडे, बी.डी.माने, सहेषराम कोरोटे, नटवरलाल गांधी, संपत सोनी, विजय बहेकार, राजेश चुटे, मोरेश्‍वर फुंडे उपस्थित राहून वर-वधूंना आशीर्वाद आणि समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.
साकरीटोला येथे मागील १५ वर्षापासून कुणबी समाजाचा सामूहिक विवाह पार पाडला जात आहे. ५ वर्ष नि:शुल्क सामूहिक विवाह सोहळे घेण्यात आले होते व सध्या वर-वधूकडून अत्यल्प शुल्क घेऊन कुणबी समाज संघटन सामाजिक बांधिलकी पार पाडत आहे. सोहळ्य़ात विवाहबद्ध होणार्‍या वर-वधूंना शासनाच्या शुभमंगल योजने अंतर्गत दहा हजार रुपयांचे धनादेश मिळणार आहे.