बियाणे व खतांचा मुबलक पुरवठा करा-संजय टेभंरे

0
8

गोंदिया,दि.19: बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने कारंजा येथील उप विभागीय कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन उप विभागीय अधिकारी नाईनवाड यांच्यासोबत बुधवारी (दि.१७) चर्चा करण्यात आली. तसेच त्यांना खरिप हंगामात शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खतांच पुरवठा करावा अशी मागणी करीत निवेदन देण्यात आले.बैठकीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी खरीप हंगामाला घेऊन कृषी विभागाची तयारी, बियाणे व खते अनुदानावर उपलब्ध करवून देणे, कृषी केंद्रांवर भ्रष्टाचार होऊ नये याकरिता तयारी आदि विषयांवर चर्चा केली. तसेच खरिपात शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाल्यास संघटना जेलभरो आंदोलन करणार असा इशारा देत निवेदन दिले.

याप्रसंगी बियाणे व खताच्या मागणीसाठी रतन बघेले, डॉ.मुन्ना तूरकर, रामू शरणाग, रोशन बोपचे, राजू रहांगडाले, डिगेंद्र रहांगडाले, एस.वाय.तूरकर, मुकेश तूरकर, दिलीप रहांगडाले, टिकाराम टेंभरे, पितांबर भलाधरे, पप्पू ठाकरे, सुनील टेंभरे, कुंडलीक तूरकर, अभिमन्यू तूरकर, अंकेश येळे, वीजय रहांगडाले, कुवर येळे, उत्तम भगत, दुलीचंद गायधने, मुन्ना चौरागडे, मुनेश कावळे, महेश परसगाये, दुलीचंद कटरे, अभिलेख खोब्रागडे, रूपचंद शरणागत, भरत रिनाईत, बुधा भगत, सुनील फाये, नरेंद्र सोनवाने, बुधराम कोहळे व अन्य शेतकरी उपस्थित होते.