गोरेगावात धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

0
9
गोरेगाव,दि.19 : रब्बी हंगामातील धनाची खरेदी करण्यासाठी धान खरेदी केंद्र गोरेगावचा शुभारंभ १६ मे रोजी तर गणखैरा खरेदी केंद्राचा शुभारंभ रोजी करण्यात आला.गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष झामसिंग बघेले यांच्या अध्यक्षतेखाली तर खरेदी विक्री संस्थेचे संचालक विशाल शेंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृउबास संचालक डॉ. कुवरलाल कटरे, खरेदी विक्रीचे संचालक डेमेंद्र रहांगडाले, खिरचंद येळे, निरीक्षक पी.एस. बोपचे, नूतनलाल रहांगडाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच गणखैरा येथील धान खरेदी केंद्राचा शुभारंभ १७ मे रोजी खरेदी विक्री संस्थाचे तालुका संचालक डॉ. के.टी. कटरे यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका खरेदी विक्रीचे संचालक डॉ. श्रीप्रकाश रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हमेंतकुमार तुरकर, नान्हू पारधी, अमृत सोनवाने, प्रकाश शेंडे, लेखचंद चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.