जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी

0
10

साकोली ,दि.24 : पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी साकोली तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झोलेल्या कामाची पाहणी करुन परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साकोली तालुक्यातील अनेक गावात कामे पुर्ण करण्यात आली. या अभियानांतर्गत शेतीचा सिंचनाची सोय होणार असुन पिण्याच्या पाण्याची समस्याही सुटणार आहे. सदर कामाची पाहणी करण्याकरिता पालकमंत्री डॉ. सावंत यांचा आज साकोली तालुक्यात कार्यक्रम घेण्यात आला. यात त्यांनी विर्शी येथील सिमेंट रस्ता बंधाराची पाहणी केली. यावेळी साकोलीचे तहसीलदार अरविंद हिंगे, उपविभागीय अभियंता ईखार, तालुका कृषी अधिकारी चौधरी, सहायक वनसंरक्षक गोखले, तालुका शिवसेना प्रमुख किशोर चन्ने, सहायक खंडविकास अधिकारी निर्वाण उपस्थित होते.