कोयलारी व निमगावात बिबट्याचा धुमाकूळ

0
17

सडक अर्जनी,दि.18- बिबट्याने सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीत आहेत. शेळ्या व कोंबड्यांची शिकार करणाºया बिबट्याची परिसरातील गावांमध्ये दहशत पसरली आहे. जवळच्या शेंडा (कोयलारी) येथील देवचंद नुळशीराम पाटील (६०) यांची गोठ्यात बांधलेली गाभन शेळी रात्री १ वाजताच्या सुमारास बिबट्याने फस्त केली.१७ च्या पहाटे शेळीचा शोध घेण्यासासाठी निघालेल्या इसमाना ती जंगलातील रस्स्त्यावर मृतावस्थेत दिसली.याची माहिती वन विभाागाचे क्षेत्र सहाय्यक मोहतुरे यांना देण्यात आली.तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील निमगाव येथे गेल्या आठवडाभरापासून बिबट्याने धूमाकूळ घातल्याने गावकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. शेजारच्या जंगल परिसरातून रात्रीच्यावेळी गावात बिबट्या येतो व कोंबड्यांना आपले भक्ष्य बनवितो. बुधवारच्या (दि.१६) रात्री बिबट्याने पहिले गोठ्यात बांधलेल्या एका बकरीला जागीच ठार केले तर एका बकरीला गंभीर जखमी केले. एक कोंबड्याला भक्ष्य बनवून गावातून पळाला या प्रकाराने गावातील नागरिक दहशतीखाली आहेत.बुधवारच्या रात्री ११.४५ वाजता बिबट्या गावात आला. गावाच्या मधोमध असलेल्या रामदास रघू मेश्राम यांच्या घरी गोठ्यात बांधलेली बकरीची शिकार केली. महागू गेडाम यांच्या घरच्या बकºयाला जखमी केले. बळीराम कोल्हे यांच्या छपरीमध्ये झाकून ठेवलेला कोंबडा जागीच मारुन सोबत घेवून पळ काढला. गावामध्ये वनविभागाच्या कर्मचाºयांची गस्त असल्याचे गावकºयांनी सांगितले.