वाघीन व छाव्याच्या शोधासाठी वनाधिकारी गस्तीवर

0
12

भंडारा,दि.25–वैनगंगा नदीपात्रातील बेटाळाकान्हळगाव दिपानात मागील १५ दिवसांपासून वाघीन व तिच्या छाव्याचे अधिवास दिसून येत आहे. आतापर्यंत त्यांनी कान्हळगाव येथील दोन जनावरांचा बळी घेतला तर दोन जखमी केले. प्रकरणी ग्रामस्थांत आक्रोश व्य्नत होत असल्याने कांद्री रेंजच्या वनाधिकार्यांनी दिपानात शोध मोहीम राबविली असता वाघीन व छाव्याच्या पायांचे ठसे आढळून आले. मात्र, वाघीनचा शोध लागला नाही. वाघीन नदीपलीकडील बेटाळा जंगलात लपून बसली असल्याचा अंदाज व्यक्त करीत कॅमेरे व प्रसंगी पिंजरे लावले जाण्याचे संकेत अधिकाèयांनी दिले आहेत.
कान्हगाव येथील शेतकèयांची मोठया प्रमाणात धानाची व बागायती शेती असून जनावरे सुद्धा येथे चाराईस सोडण्यात येतात. त्यामुळे कान्हळगाव व बेटाळा येथील शेतकरी दिपानात जाण्यास घाबरत आहेत. सर्व जनावरांचा कांद्री येथील वनाधिकाèयांनी पंचनामा केला असला तरी या घटनांमुळे दोन्ही गावात आक्रोश व्य्नत झाला. वाघीनच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात येत होती. दि. २४ ऑगष्ट रोजी वनाधिकारी डी.पी. चकोले यांच्या नेतृत्वात कांद्री वनविभागाची शोध चमू कान्हळगावात पोहचली. ग्रामस्थांच्या मदतीने वैनगंगा नदी पात्र पार करून दिपानातील सुमारे १० किमीचा परिसर पिंजून काढण्यात आला. त्यावेळी वनाधिकाèयांना वाघीनच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे विश्वास पटल्याने त्यांनी संपूर्ण परिसर शोधून काढला मात्र, वाघीन व तीचा छावा दिसून आला नाही.
वाघीन दिवसाचे वेळी बेटाळा वनक्षेत्रात लपून राहत असूनसायंकाळचे सुमारास दिपानात येत असल्याचे लक्षात येताच बेटाळा वनक्षेत्रात शोध मोहीम राबविणार असल्याचे वनाधिकाèयांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर हा भाग कोका वन्यजीव अभयारण्य व विस्तीर्ण वैनगंगा पात्राशी सोडला गेला असल्याने वाघीन नेमकी कुठे मिळेल, याबाबतीत सांगता येणे कठीन आहे. वाघीनच्या पूर्ण खात्रीसाठी दिपानाच्या भागात कॅमेरे लावले जातील व वेळप्रसंगी वाघीन व तीच्या छाव्याला पकडण्यासाठी qपजरे लावण्याचे संकेतही वनाधिकाèयांनी यावेळी दिले.