चंद्रपूर महानगरपालिकेला आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र

0
21

चंद्रपूर,दि.31-चंद्रपूर महानगरपालिका आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली महानगरपालिका ठरली आहे. २८ ऑगस्ट रोजी ओटबू सर्टिफिकेशन लिमिटेडचे (युके) दत्ता यांच्याकडून महानगरपालिकेला देण्यात आलेले आयएसओ गुणवत्ता प्रमाणपत्र ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांना प्रदान करण्यात आले.
महानगरपालिकेचे महात्मा गांधी भवन ही वास्तु अत्यंत देखणी असून प्रत्येक कक्ष अतिशय आधुनिकरित्या सजविल्या गेले आहे. दर्शनी भागावर स्वच्छतेचा संदेश देणारे चित्र रेखांकित केलेले आहे. मनपाच्या सर्वसाधारण सभेचे सभागृह देखील अत्याधुनिक आहे. त्यामुळेच आयएसओ नामांकन मिळाले आहे. आय.एस.ओ. गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाणे, ही गवार्ची बाब असून शहराच्या विकासासाठी नेहमी काम करण्याचा मानस असल्याचे मनोगत महापौर अंजली घोटेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला ना. सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा हजारे, मनपा सभागृह नेता वसंत देशमुख, उपायुक्त भालचंद्र बेहरे, विजय देवळीकर, सहाय्यक आयुक्त अंजली आंबटकर, सचिन पाटील, धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, मुख्य लेखाधिकारी गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, विजय बोरीकर, अनिल घुमडे, रवींद्र हजारे, नागेश नित, नगरसेवक, नगरसेविका, शहराचे नागरिक उपस्थित होते.