उपमुकाअ राठोड यांनी घेतला घाटबोरीतेलीचा ग्राप चा आढावा

0
10

सडक अर्जुनी,दि.०५–गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या घाटबोरी तेली या ग्रामपंचायतीचा शौचालय वापरासबंधीचा आढावा संपुर्ण स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी नुकताच घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी आनंद लोकरे,उपसरपंच नाजुकराम qझगरे,जिल्हा कक्षातील सल्लागार भागचंद रहागंडाले,विस्तार अधिकारी खुणे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी व उमेदच्या वर्धिंनी उपस्थित होत्या.राज्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत घेण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती राठोड यांनी यावेळी दिली.ग्रामसेविका कु.मुंडे यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या बांधकामाविषयीचा आढावा सादर केला.