ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रम संपन्न

0
8

गोंदिया,दि.५ : सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे १ ऑक्टोबर रोजी ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनङ्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेले नियम व त्यातील तरतूदी/सवलती इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री.तागडे, उदघाटक ॲड.पुरुषोत्तम आगासे, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सविता बेदरकर, समाज कल्याणचे विशेष अधिकारी संभाजी पोवार, जिल्ह्यातील महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याणचे विशेष अधिकारी संभाजी पोवार यांनी केले. संचालन सहायक शिक्षक प्रदिप ढवळे यांनी केले, उपस्थितांचे आभार तालुका समन्वयक निवास शहारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकल्याण निरिक्षण विनायक जटाळे, सतीश वाघ, श्रीमती विद्या मोहोड, तसेच मनोहर सोनटक्के, लक्ष्मण खेडकर, योगेश हजारे, माणिक इरले, दिवांशू तिरपुडे त्याचप्रमाणे क्रिस्टल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.