खोटी आश्वासने देणाºयांना जनतेने धडा शिकविला

0
16

गोंदिया,दि.23 : जिल्ह्यात अलीकडेच पार पडलेल्या ३४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि विकासात्मक कामांवर विश्वास टाकला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात १८९ ग्रामपंचायतीवर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस समर्थीत सर्वाधिक उमेदवार निवडून आले. जनतेने मतपेटीतून खोटी आश्वासने देणाºयांना धडा शिकविल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर ते गोंदिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते. अग्रवाल म्हणाले, ३४७ ग्रामपंचायतीपैकी काँग्रेसने ११६, राष्टÑवादी काँग्रेस ७३, अपक्ष १२ आणि शिवसेना समर्थीत ४ सरपंच निवडून आले. तर भाजपला केवळ १३९ सरपंच निवडून आणता आले. काँग्रेस आणि राष्टÑवादी समर्थीत सरपंचाची बेरीज केल्यास १८९ ग्रामपंचायतीवर या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन केली आहे. तर भाजप आणि शिवसेनेचे १४३ सरपंच निवडून आले. याचाच अर्थ ग्रामीण भागातील जनता आता सरकारच्या खोट्या आश्वासनामुळे त्रस्त झाली आहे.
वाढती महागाई आणि जीवनाश्वक वस्तूंचे वाढते दर यामुळे गोरगरिबांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्याचाच रोष ग्रामीण भागातील मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केल्याचे अग्रवाल म्हणाले. भाजपा केवळ सोशल मिडियावर खोटी आकडेवारी टाकून जनतेची दिशाभूल करित असल्याचा आरोप केला. मात्र जनतेने भाजप सरकारचा खरा चेहरा ओळखला आहे. त्यामुळे जनता भाजपा सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नसल्याचे सांगितले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे म्हणाले, ज्या विश्वासाने मतदारांनी लोकसभा आणि विधानसभेत भाजपा उमेदवारांना निवडून दिले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. त्यामुळे मतदारांचा मोहभंग झाला. त्यामुळेच ग्रामीण भागातील जनतेमध्ये सरकारप्रती रोष असल्याचे सांगितले.
लहीटोला ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा
तालुक्यातील लहीटोला येथील ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस समर्थीत पॅनल तयार करुन लढविण्यात आली. या निवडणुकीत सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. सरपंचपदी दिनेश तुरकर निवडून आले. लहीटोला येथे निवडून आलेल्या उमेदवारांनी तुरकर यांच्या नेतृत्त्वात आमदार गोपालदास अग्रवाल यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी अग्रवाल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, क्रितीलाल नागपुरे, देवकला चुलपार, लक्ष्मीचंद चचाने, सिंधू मेश्राम, केशरबाई गौरखंडे, शैलेश सहारे, सागणबाई चुलपार उपस्थित होते.