Home विदर्भ चोरखमार्याच्या सरपंच श्रीमती रामटेके भाजपवासी

चोरखमार्याच्या सरपंच श्रीमती रामटेके भाजपवासी

0

तिरोडा,दि.27- तालुक्यातील स्वच्छता अभियानात राज्यस्तरावर पोचलेल्या चोरखमारा गावाच्या नुकत्याच पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत श्रीमती कंचना रामटेके या विजयी झाल्या.विशेष म्हणजे त्या यापुर्वी जेव्हा या ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या तेव्हा या गावाने स्वच्छता अभियानात चांगली कामगिरी बजावली होती.त्यांच्या कार्याकाळातील कामाची जमेची बाजू असल्यानेच जनतेने श्रीमती रामटेके यांना अपक्ष म्हणून सरपंच निवडून दिले.त्यानंतर गावाचा विकास हा उद्देश समोर ठेवून तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज शुक्रवारला भारतीय जनता पक्षात आपल्या 29 कार्यकर्त्यासह प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या रजनी कुंभरे ,मिलींद कुंभरे  व इतर उपस्थित होते.

Exit mobile version