गौरव पुरस्कार योजनेची जिल्हास्तरीय निवड समिती बैठक

0
10

भंडारा,दि.2 : आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजनेची जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी आरोग्य सभापती विनायक बुरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रविशेखर धकाते, वैद्यकीय संघटनाचे अध्यक्ष डॉ. पुनम बावनकर, अशासकीय संस्था प्रतिनिधी डॉ. सुलभा मस्के, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सदानंद मोहतूरे, पत्रकार प्रतिनिधी सुरेश कोटगले, उपस्थित होते.
यावळी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य विभागाने डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजना सुरु केली असून शासकीय तथा अशासकीय आरोग्य संस्था, शासकीय डॉक्टर, शासकीय महिला डॉक्टर व खाजगी डॉक्टर यांना भरीव आरोग्यसेवेसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहे. १० नोव्हेंबर पर्यंत खाजगी संस्थांकडून व वैयक्तिक खाजगी डॉक्टर यांचे कडून पुरस्कार मागविण्यात येत आहेत. विशेषत: वैयक्तिक पुरस्कारासाठी अशासकीय डॉक्टर, अशासकीय महिला डॉक्टर शासकीय डॉक्टर व शासकीय महिला डॉक्टर, खाजगी संस्था यांनी या पुरस्कारासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले आहे.बैठकीचे संचालन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधूरी माथुरकर तर आभार जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी भगवान मस्के यांनी मानले.