कापुस उत्पादक  शेतकऱ्यांसमोरील कृषीसंकट गंभीर – किशोर तिवारी

0
16

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ),दि.20 – संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लागवडीखाली असलेले नगदी पीक ‘कापुस’ आज  विकसित तंत्रद्यानाचे व तसेच कृषी खाते ,केंद्रीय कापूस शोध संस्था, भारतीय कृषी संशोधन परिषद ,कृषी विद्यापीठ याचे उपयश, जागतीक बाजारातील प्रचंड मंदी यामुळे आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असुन एकीकडे हवालदील झालेला विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक विपन्नावस्थेत आपली जीवनयात्रा संपवीत आहे तर दुसरीकडे या गंभीर विषयावर राजकीय नेते आपली राजकीय पोळी शेकत आहेत मात्र या मनावनिर्मित सुलतानी संकटावर एकात्मिक तोडगा काढण्यासाठी तात्काळ कार्यक्रम घोषीत करण्याची मागणी कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली  आहे .
महाराष्ट्र राज्यात कापूस पिकाखाली ४४ लाख हेक्टरचे क्षेत्र असून ऑक्टोबर नंतर सर्वच ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे हे सत्य आहे त्यामुळे आता डिसेंबरनंतर कापसाची आवक प्रचंड प्रमाणात घटली असुन ज्या ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रासायनिक खताचा वापर करीत कापसाला पाणी दिले त्यासर्वच शेतकऱ्यांना बोंडअळीचा फटका बसला असुन जुलै ऑगस्ट मध्ये आलेली बोंड तेही बहुतेक कोरडवाहू क्षेत्रात ऑक्टोबर नोव्हेंबर फुटली व सर्वच शेतकऱ्यांचे पहिला व दुसरा वेचा चांगला आला, त्या कापसाची आवक पाहुन बोंडअळीचे संकट कृषिविभाग कमी आखत असुन सरकारची दिशाभुल करीत असल्याचा गंभीर आरोप यावर्षी महाराष्टात व लगतच्या तेलंगणामध्ये सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात बोंडअळी संकट आले व आज राज्यात जेमतेम ९८ लाख क्विंटल कापसाची आवक झाली आहे या खरीप हंगामात सुरवातीला ३५० ते ४०० लाख क्विंटल कापसाची विक्रमी उत्पादन राज्यात होणार असा विश्वास होता मात्र गुलाबी बोंडअळीने हे कापसाचे उत्पादन १८० ते २२० लाख क्विंटलच्या घरात आणले आहे यामुळे शेतकऱ्यांचे कमीतकमी रु १० हजार कोटीचे नुकसान झाले आहे मात्र कृषी विभाग बियाणे कंपन्यांवर कोर्ट केसेस दाखल करून वसुल करून देणार असा पोकळ दावा करीत आहे राष्ट्रीय व राज्य विपदा निधींमधून देण्यात येणारी मदत सुद्धा कृषी विभागाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे तोटकी मिळणार अशी भीती निर्माण झाली कारण सध्या ५ लाखावर कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकृत तक्रारी दिल्या आहेत तर सुमारे ५ लाखावर आदीवासी दलीत मागासवर्गीय भूमिहीन शेतकरी बियाणाची पावती व बियाण्यांच्या पाकिटावरील ‘रॅपर’देखील सादर करण्याची अट असल्यामुळे तसेच हजारो शेतकऱ्यांनी बोगस तण नाशक निरोधक बी जि ३ कापसाचे बियाणे व राज्यात बंदी घातलेले राशी ६९५ लगतच्या राज्यातुन विकत आणुन पेरल्यामुळे तक्रारी करण्यापासुन वंचित असल्याचे आपल्याला दौऱ्यात दिसल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.