शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका-भोंडेकर

0
5

भंडारा,दि.09 : भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून आणेवारी जाहिर करण्यात आली. त्यानुसार मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली व लाखांदूर या तालुक्यांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी दाखविण्यात आली. भंडारा व पवनी या तालुक्याची आणेवारी ५६ पैसे दर्शविण्यात आली. याचाच अर्थ, भंडारा व पवनी तालुक्यातील केवळ आठ गावे वगळून २९९ गावातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे, फेरसर्व्हेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकºयांना लाभ देण्यात यावा. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रपरिषदेत दिला.
भंडारा आणि पवनी या दोन तालुक्यातील २९९ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक दाखविल्याने शेतकºयांवर अन्याय झाला. यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. याप्रकरणात भंडाराचे उपविभागीय दंडाधिकारी यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणीही भोंडेकर यांनी केली.