खुल्या प्रवर्गातून अर्जाची परवानगी देण्याची ओबीसी संघटनेची मागणी

0
10

गोंदिया,दि.11-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित परीक्षामध्ये मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्याची परवानगी प्रदान करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी संघर्ष कृती समिती जिल्हा संघटनेव्दारे निवेदनातून  उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली.
निवेदनात म्हटले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणार्‍या परीक्षामध्ये मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यास मनाई आहे. खुल्या प्रवर्गातून मागासवर्गीयांना अर्ज भरण्यास नाकारणे म्हणजे १५ टक्के लोकांसाठी ५0 टक्के जागा राखीव ठेवणे आहे. आधीच न्यायालयाने आरक्षण ५0 टक्के र्मयादित केले असल्याने १५ टक्के समाजासाठी केलेली अप्रत्यक्ष आरक्षणाची तरतूद होय.
खुल्या प्रवर्गातून मेरिटला नाकारणे म्हणजे मागासवर्गीय मेरिट विद्यार्थ्यावर अन्याय असून असा अन्याय ओबीसी संघर्ष कृती समिती व समविचारी संघटन खपवून घेणार नसून याचे तीव्र प्रतिसाद उमटल्यास त्यास शासन, प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आधीप्रमाणे अर्ज करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.निवेदन देतेवेळी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,उपाध्यक्ष कैलास भेलावे,तिर्थराज उके,मार्गदर्शक व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,नागेश ठाकूर,शरद मेश्राम,राजू खोब्रागडे व प्रेमलाल गायधने यांचा समावेश होता.