विषय समिती सभापतीसाठी भाजपकडून डोंगंरे व सौ.सोनवने,काँग्रेसकडून अंबुले व सौ.दोनोडे तर राँका कडून तरोणे,भक्तवर्ती,डोंगरे व सौ.तिरांलेंचा अर्ज

0
10

गोंदिया,दि.३०-जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जुळलेली मैत्री भाजप व काँग्रेसने पुन्हा घट्ट केली. या निवडणुकीतही काँग्रेसने राष्ट्रवादीला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी आपण सख्खे वैरी सख्खे भाऊ चा नारा देत जुनीच मैत्री कायम ठेवली आहे.सभागृहात २० सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीला यावेळीही विरोधी बाकांवर बसून भाजप-काँग्रेसचा संसार बघावा लागणार आहे.त्यातच काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शेखर पटले यांचे आज निधन झाल्याने काँग्रेसची संख्या १६ वरुन १५ वर आली आहे.सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपमध्ये मात्र अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या विषय समिती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विषय समितीच्या समाजकल्याण समिती सभापतिकरीता भाजपकडून विश्वजीत डोंगरे, राष्ट्रवादीकडून मनोज डोंगरे यांनी अर्ज दाखल केला आहे.काँग्रेसने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेस-भाजप युती स्पष्ट दिसून येत आहे.त्याचप्रमाणे महिला बालकल्याण विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेसकडून लता दोनोडे तर राष्ट्रवादीकडून दुर्गा तिराले यांनी अर्ज दाखल केले आहे. यात भाजपने आपला उमेदवार रिंगणात उतरविला नाही. उरलेल्या दोन विषय समितीकरीता झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून रमेश अंबुले यांनी तर भाजपकडून शैलजा सोनवाने यांनी अर्ज दाखल केला.तर राष्ट्रवादीकडून किशोर तरोणे व राजेश भक्तवर्ती यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.