शंभर वर्षांपूर्वीचा रस्ता अदानीकडून बंद शेतकºयाने शेतात जायचे कसे?

0
11

तिरोडा,दिं.२ : तब्बल शंभर वर्षांपासून चुरडी येथील शेतकरी ज्या रस्त्याने आपल्या शेतात जाऊन शेती कसत होते. तोच रस्ता अदानी प्रकल्पाने सुरक्षा भिंत बांधून बंद करण्याचा डाव खेळल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये कमालीचा रोष पसरलेला असून अन्यायकारकरित्या बंद करण्यात आलेला रस्ता अदानीने सुरू ठेवावा़ याकरिता आ. विजय रहांगडाले यांची शेतकºयांनी भेट घेऊन त्या सुरक्षा भिंतीचे बांधकाम थांबविण्याची मागणी केली आहे.
चुरडी येथील शेतकरी जांभुळकर कुटुंबीयांची सुमारे ३० एकर शेती असून या शेतीमध्ये जाण्याकरिता मागील शंभर वर्षांपासून वहीवाटीचा रस्ता अदानी वीज प्रकल्पातर्फे सिमेंट काँक्रीटची सुरक्षा भिंत बनवून बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यामुळे जांभुळकर कुटुंबीयांचे शेतात जाणे-येणे बंद होणार आहे. यामुळे जांभुळकर कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. तेव्हा अदानी प्रकल्पातर्फे अन्यायकारकरित्या हा शंभर वर्षांपासून वहीवाटीकरिता असलेला रस्ता अदानी प्रकल्पातर्फे बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याने हा रस्ता बंद करण्यापासून अदानी प्रकल्पाच्या अधिकाºयांना परावृत्त करावे, अशी मागणी जांभुळकर कुटुंबीयांनी ३१ जानेवारी रोजी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयकुमार रहांगडाले यांना केली आहे. तेव्हा आ.रहांगडाले हे शेतकºयांच्या मागणीकडे लक्ष देतात की, त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवितात याकडे परिसरातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

या अगोदरही अदानी प्रकल्पातून जी राख निघत असते ती, जमिनीत पुरून नष्ट करण्याऐवजी शेतकºयांच्या शेतात घालून शेतकºयांची सुपीक जमीन नापीक करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते. त्यात पुन्हा तब्बल शंभर वर्षांपासून शेतकºयांच्या शेतात जाणाºया रस्त्याला सुरक्षा भिंत बांधून त्या शेतकºयावर उपाषमारीची वेळ आणली आहे.