11 फेब्रुवारीला पहिल्यांदाच जिवती येथे आंबेडकरी युवा तथा बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

0
18

चंद्रपूर ,दि.3::- जिवतीच्या भव्य पटांगणावर पहिल्यांदाच ११ फेब्रुवारी २०१८ रोजी “आंबेडकरी युवा तथा बौध्द धम्म परिषद” समता सौनिक दल चंद्रपुर द्वारा आयोजीत केली आहे. आंबेडकरी युवा तथा बौद्ध धम्म परिषद मधील आयोजीत कार्यक्रम २ सत्रात होणार आहेत. प्रथम सत्रामध्ये सकाळी ९ वाजता धम्मक्रांती सलामी मार्च, धम्मवंदना व शपथग्रहण समारंभ ९.३० ते १०.०० वाजता धम्मगीत व सुगमसंगीत १० ते १२ परंत “आंबेडकरी समाजापुढील सद्या स्थितीतील आव्हाने एक आलेख या विषयावर धम्म प्रबोधन सदर प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्शल गौतम क्रांतिघोष, समता सौनिक दल प्रमुख मर्गदर्शक मार्शल प्रा.सुभाष करूनिक सर, समता सैनिक दल, मार्शल प्रा.शितल कुमार वानखेडे सर, स.सै.द.भंते सिध्दार्थ, नागपूर मार्शल निवारण कांबळे सर स.सै.द.सदर प्रबोधन कार्यक्रमाचे संचालन मार्शल विनोद बरडे सर, स.सै.द.हे करणार आहेत तर प्रास्ताविक मनीषा गावंडे मॅडम, स.सै.द. तर आभार राजश्री मौर्य मॅडम, स.सै. द. या करणार आहेत.
तसेच १२ ते ०१ च्या दरम्यान भोजनाची व्यवस्था केली आहे. व्दितीय सत्रामध्ये ०१ ते ०५ च्या दरम्यान “धम्मक्रांतीचे ६१ वर्षे एक चिंतन” या विषयावर विस्तृत मर्गदर्शन मिळणार आहे. याचे अध्यक्ष, मार्शल ऍड.विमलसूर्य चिमनकर सर, केंद्रीय संघटक समता सैनिक दल हे असणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक मार्शल डॉ.भास्कर कांबळे सर, बौध्द विचारधारेचे भाष्यकार, समता सैनिक दल, मार्शल मनीष मौर्य सर, समता सैनिक दल व्दितीय सत्रातील प्रबोधन कार्यक्रमाचे संचालन विवेक बक्षी सर, समता सैनिक दल हे करणार आहेत. तसेच प्रास्ताविक उजवला खोब्रागडे मॅडम, समता सैनिक दल या करणार आहेत तर आभार मनीषा दुबे मॅडम समता सैनिक दल या करणार आहेत.
आज देशातील विषमतावादी शक्ती बौद्धमुक्त भारत करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत यासाठी आम्हाला “सारा भारत बौद्धमय करेल ” हि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिज्ञा एक मिशन म्हणून समोर घेऊन जावे लागेल ही धम्मचेतना जागविण्यासाठी ११ फेब्रुवारीला आयोजीत कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन समता सौनिक दल जिवती युनिट द्वारे करण्यात येत आहे.