जिल्हा मराठी पत्रकार भवनासाठी 25 लाखांचा निधी 

0
12

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
• पत्रकार पेन्शन योजना अंतिम टप्प्यात
• पत्रकार संघाच्या संकेतस्थळाचे उदघाटन

भंडारा,दि. 4 :- :-भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वास्तूसाठी 25 लाख रुपयांचा निधी शासनातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पत्रकार भवन येथे आयोजित आरोग्य शिबीर व पत्रकार संघाच्या संकेतस्थळ उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, ॲड.रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, उपाध्यक्ष राकेश चेटुले, सचिव मिलींद हळवे व पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार संघाच्या संकेतस्थळाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकारांना आव्हांनाचा सामना करावा लागतो. पत्रकारांना सोईसुविधा पुरविण्यासाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आहेत. पत्रकार हल्ला विरोधी कायदा, घरकुल योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आदींचा यात समावेश आहे. पत्रकार भवनाच्या इमारत बांधकामासाठी 25 लाखांचा निधी शासन देईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष चेतन भैरम यांनी केले. संचलन बबन मेश्राम यांनी केले तर आभार डी.एफ. कोचे यांनी मानले.