23.4 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ ‘कबड्डी’चा वाद शिगेला, वाहनांच्या जाळपोळीसह दगडफेक

‘कबड्डी’चा वाद शिगेला, वाहनांच्या जाळपोळीसह दगडफेक

0
33

खामगाव दि.२४:: खामगावात कबड्डी सामन्याच्या वादातून निर्माण झालेला पेच अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी ( 23 फेब्रुवारी ) उशीरा रात्री शहरातील शिवाजी नगर आणि सतीफैल भागात दोन वाहने पेटवण्यात आली. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री घडली.शहरातील  शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळाडूच्या प्रोत्साहनावरून वाद झाला होता. या  वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले होते. तर  १०-१२  वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.  बुधवारी ( 21 फेब्रुवारी ) सायंकाळपासून या भागात सतीफैल विरुद्ध शिवाजी फैल असा सामना रंगत असून, गुरूवारी (22 फेब्रुवारी) रात्री ९.३० वाजता दोन्ही फैल समोरा-समोर झाले. कबड्डीच्या वादाची धुसफूस कायम असल्याने, या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.