24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ जिनिंग फॅक्टरीत आग; कापूस व सरकी जळाली

जिनिंग फॅक्टरीत आग; कापूस व सरकी जळाली

0
25

यवतमाळ ,दि. २३ :: जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील आशापुरा जिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास आग लागली. पाहता पाहता या आगीने भीषण रुप धारण केले व त्यात फॅक्टरीमधील कापूस व सरकी मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या येऊन आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. या आगीमुळे किती नुकसान झाले त्याचा आकडा अद्याप सांगता येत नाही.