25.8 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मॅटाडोर आढळला झा़डाला

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मॅटाडोर आढळला झा़डाला

0
31

गोंदिया,दि.5ः- गोंदिया कडून गोरेगाव कडे धानाचे पोते घेऊन जात असलेल्या मॅटाडोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारंजाजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडाला धडक दिल्याने चालक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 10.30 वाजता घडली. एमपी 20/GA-2360 क्रमांकाच्या मॅटाडोर चालकाने आपल्या ताब्यातील वाहण पोलीस मुख्यालया जवळ असलेल्या चौकातून वळविण्याचे प्रयत्न केला. मात्र त्याचे नियंत्रण सुटल्याने गाडी निंबाच्या झाडांवर धडकली. यात चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन गाडीत अडकून असलेल्या चालकाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले.