24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ हिरापुरात उज्ज्वला गॅस योजनेतून सिलिंडरचे वाटप

हिरापुरात उज्ज्वला गॅस योजनेतून सिलिंडरचे वाटप

0
30

गोरेगाव,दि.29ः-तालुक्यातील हिरापूर गावातील अनेक लाभार्थी परिवाराला गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे.अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, गॅस वितरक म्हणून आ. विजय रहांगडाले, प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं. स. सभापती दिलीप चौधरी, माजी उपसभापती बबलू बिसेन, पं.स. सदस्य पुष्पराज जनबंधू , माजी सरपंच सतीश रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी गावकर्‍यांना गरीब कुटुंबातील महिलांना लाकडे जाळून धुरापासून होणार्‍या नुकसानीची दखल घेत केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणून महिलांच्या आरोग्याची दखल घेतली व गोरगरीब महिलांना गॅस वाटप करण्यात येत आहे. यावेळी आ. विजय रहांगडाले यांनी उज्ज्वला गॅस वाटप योजनेतून विधानसभा क्षेत्रातील सर्व गावात गॅस वाटपातून लाभ देऊन महिलांना डोळ्याचा त्रास होऊ नय व जंगली लाकडे जाळू नये म्हणून भारत सरकारने चांगली योजना हाती घेतली व सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत असे मत यावेळी व्यक्त केले.