विदर्भ वाहनाच्या धडकेत ३ हरणांचा मृत्यू October 1, 2018 036 FacebookXPinterestWhatsAppTelegram गोंदिया,दि.01 – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर धोबीसराड गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ३ हरणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. तर, एका गर्भवती हरिणीच्या पिल्लाचाही या अपघातात गर्भातच मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग हा नवेगाव नागझीरा व्याघ्र प्रकल्पाच्या सिमेतून जात असून नेहमीच वन्यजिवांचा वावर असतो. रविवारी धोबी सराळ घाटाजवळ ही हरणे रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. या धडकेत ३ हरिणींचा जागीच मृत्यू झाला. तर एक हरिण गंभीर जखमी झाले आहे.