ओबीसी आरक्षणासाठी शेकापचा गडचिरोलीत चक्काजाम

0
12

गडचिरोली,दि.29ः-ओबीसींचे आरक्षण पूूर्ववत १९ टक्के करण्यत यावे या प्रमुख मागणीसह शेतकर्‍यांच्या धानाला साडेतीन हजार हमीभाव देण्यात यावा, ढिवर समाजाला मामा तलाव, बोडीतील मासेमारीचे मालकी हक्क देण्यात यावे, शेतकर्‍यांना सरसकट कर्जामाफी देण्यात यावी, संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वात २८ नोव्हेंबर रोजी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये चक्काजाम आंदोलन केले. यामुळे राज्य महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
येथील इंदिरा गांधी चौकात शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, महिला नेत्या जयश्री वेळदा, पुरोगामी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना चुधरी, तालुका चिटणीस सुधाकर आभारे, रोशन नरुले, दिनेश बोरकुटे, श्यामसुंदर उराडे, श्रीधर मेर्शाम यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विजया मेर्शाम, पुष्पा चापले, सुनीता आलेवार, गीता बोबाटे, शेवंतार्बाइ नैताम, शीला टिकले, मालू नैताम, शेवंता भांडेकर, सुषमा मडावी, ज्योत्स्ना कुकुडकर, ललीता नैताम, छाया नैताम, ललीता मानकर, अनुसया भोयर, योगीता कोरेले, गीता मानकर, सुनीता पवार, पार्वती पवनकर, पुष्पा कोतवालीवाले, प्रियंका कुमरे, शोभा मेर्शाम, क्षीरसागर मानकर, लता नैताम, आशा बावणे, वसुंधरा कोडापे, योगीता भोयर, ऐश्‍वर्या बावणे, सुरेंद्र इष्टाम, आकाश आत्राम, अजित नरोटे, गुरुदेव मडावी, कृष्णा मानकर, महेश गहाणे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामुळे बराच वेळपयर्ंत चारही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक दीपर% गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना व्हॅनमध्ये भरुन पोलिस नेले. तेथे त्यांना बराच वेळपयर्ंत स्थानबद्ध करून ठेवण्यात आले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
भेंडाळा- येथे रमेश चौखुंडे, दुर्वास म्हशाखेत्री यांच्या नेतृत्वात आंदोलन करून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत झालेच पाहिजे, धानाला ३५00 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा, अशा घोषणा देऊन चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनात दिनेश चुदरी, रमेश चौखुंडे, प्रदीप आभारे, दुर्वास मशाखेत्री, राजू केळझरकर, प्रभुदास पाल, भतुराव पाल, लालचंद्र सोयाम, योगेश चौखुंडे, प्रदिप भाकरे, रूपेश राऊत, व्यंकटेश बोरकुटे, प्रभाकर आभारे, भोजराज आभारे, पत्रू आभारे, गजानन पोरटे, सुनील आभारे, किशोर जनगमवार, प्रमोद गोर्लावार, चरणदास सेलोटे, निलज धोटे, नानूजी गोहणे, भैय्याजी बोरकुटे, जीवनदास मेर्शाम, प्रलय साखरे तसेच भेंडाळा, सगनापूर, घारगाव, एकोडी, वाघोली, रामाळा गावातील नागरिक सहभागी झाले होते.
चामोर्शी- येथे तालुका चिटणीस दिनेश चुधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात धनराज वासेकर, राजेंद्र धोडरे, प्रदीप गुरनुले, गंगाधर थोरात, रंगुदास पाल, भालचंद्र सयाम, चरणदास सेलोटे, योगेश चौखुंडे, गजानन पोरटे, प्रदीप भाकरे, प्रदीप आभारे, बाळू दहेलकर, आनंदराव लोंढे, मिननाथ उरकुडे, मंगेश मंगर, राहुल झाडे, किशोर चुधरी, संजय अड्डूरवार, मुखरु बावणे, दिवाकर भोयर, आशिष खोब्रागडे, बाळू उंदिरवाडे, मनोज पोरटे, योगेश आभारे, किशोर डांगे, शंकर झाडे, यादव मंगर, राजू केळझरकर, नरेश चौखुंडे, सुनील कालेर्वार, वसंत गव्हारे, अजय यासलवार, विलास भोगावार, संतोष बुरांडे, अनिल येनगंटीवार, आशिष कालेश्‍वरवार, मिलन दुबे, संतोष चिचघरे, रोशन नैताम यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आष्टी: येथे पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात विनायक निमसरकार, रवी वनकर, प्रणय धोटे, सुरेश भडके, अजय वनकर, विकास शेडमाके, सूरज शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करुन आष्टी-गोंडपिपरी, आष्टी-अहेरी व आष्टी-चामोर्शी मार्ग रोखून धरला.