मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी,धावडे यांची उपाध्यक्षपदावर निवड

0
8

तिरोडा : विदर्भ मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी तीन वर्षासाठी गठित करण्यासाठी विदर्भातील मुख्याध्यापकांची सभा मेजर हेमंत जकाते विद्यालय म्हळणीनगर नागपूर येथे पार पडली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शंकरराव निंबाळकर तर सहायकनिवडणूक अधिकारी म्हणून वर्धा येथील नरेशचंद्र वाळके यांनी काम बघितले.या वेळी ३७५ मुख्याध्यापक मतदारांपैकी २२४मुख्याध्यापक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सचिव व सहसचिव पदासाठी निवडणूक घ्यावी लागली तर बाकी सर्व पदे सर्वसहमतीने निवडून दिले गेलेत. त्यात गोंदिया जिल्ह्यातील प्रगती हायस्कूल सरांडीचे मुख्याध्यापक रामसागर धावडे यांची उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली. या निवडणुकीत विभागीय मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर (अकोला), कार्यवाह सतीश जगताप (वर्धा), उपाध्यक्ष नागपूर विभाग रामसागर धावडे (मुख्याध्यापक प्रगती हायस्कूल सरांडी ता.तिरोडा, जि. गोंदिया), अमरावती विभाग उपाध्यक्ष विनोद संगीतराव, सहसचिव नागपूर विभाग उदय देशमुख तर अमरावती विभागातून मंगेश धातोरकर यवतमाळ हे निवडून आले.कोषाध्यक्ष राजकुमार बालपांडे (माजी मंडळ सदस्य) यांची निवड करण्यात आली. निवडणुकीसाठी मुख्याध्यापक संघाचे राज्याचे अध्यक्ष मारोतराव खेडीकर, राज्य कोषाध्यक्ष दीपक दौंदल, मधुसूदन मुडे, अशोक पारधी, गवळी, रजिया बेग पटेल, मंदा उमाढे, प्रकाश पटेल, टी.एस.गौतम यांनी सहकार्य केले.