विश्वासघाती सरकारला धडा शिकवा-वर्षा पटेल

0
14

सडक अर्जुनी,दि.02 : केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी मोठ मोठ्या घोषणांचा पाऊस केला होता. मात्र सत्तेवर येताच या सर्व घोषणांचा सरकारला विसर पडला आहे. मागील साडेचार वर्षांत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे एकही काम सरकारने केले नाही. उलट शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या विरोधी धोरणामुळे सर्वजण त्रस्त झाले. त्यामुळे जनतेचा विश्वासघात करणाऱ्या सरकारला आगामी निवडणुकात धडा शिकविण्याचे आवाहन, मनोहरभाई पटेल अ‍ॅकडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी केले.
तालुक्यातील तेजस्विनी लॉनमध्ये मंगळवारी (दि.२९) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तालुकास्तरीय महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्या बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे, सडक अर्जुनीचे नगराध्यक्ष देवचंद तरोणे, भंडारा जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा कल्याणी भूरे, जि.प.सदस्य रमेश चुºहे, माजी जि.प.उपाध्यक्ष छाया चव्हाण, पं.स. सदस्य इंदू परशुरामकर, माजी नगराध्यक्ष रिता लांजेवार, पं.स. सदस्य सुधाकर पेंदरे, माजी पं.स. सभापती वंदना डोंगरवार, माजी नगराध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, नगरसेवक चंद्रप्रभा मुनिश्वर, माजी जि.प. सदस्य किरण गावराणे, माजी पं.स. उपसभापती अनुसया लांजेवार उपस्थित होते. वर्षा पटेल म्हणाल्या, महिलांनी आता जागृत होण्याची गरज आहे. महिला मेळाव्याला उपस्थित महिलांची उपस्थिती पाहून महिला आता घराबाहेर पडू लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. महिलांनी चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित राहण्याचे दिवस आता संपले आहे. महिलांनी घराबाहेरपडून कुटुंब आणि समाजाचा विकास करण्याचे आवाहन केले. कुकडे म्हणाले की, भाजपा सरकारने या देशातील शेतकऱ्यांचा विचार न करता फक्त भांडवलदारांचाच विचार केला आहे.चंद्रीकापुरे म्हणाले मागील साडेचार वर्षात या सरकारने ना महिला,शेतकऱ्यांना किंवा बेरोजगारांना कोणालाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे अशा सरकारला त्यांची जागा देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक रजनी गिºहेपुंज यांनी मांडले. संचालन मंजू चंद्रीकापुरे व आभार मंजू डोंगरवार यांनी मानले.