राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने जयंत शुक्ला सन्मानित

0
20
गोंदिया,दि.11 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित सातवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात २ फेब्रुवारी रोजी पत्रकार जयंत शुक्ला यांना वर्ष २०१७-१८ चा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, संमेलनाध्यक्ष पद्मश्री डॉ. अभय बंग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, आ. नाना शामकुळे, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, अभिनेत्री अनिता दाते, श्रीमती शारदा बडोले आदी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार जयंत शुक्ला यांचा पत्नी अश्विनी शुक्ला यांच्यासह शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुरस्काराचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.